आज राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत घट झाली. तरीही राज्यात ४८ हजार ७०० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज ७१,७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज ५२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर १.५% एवढा आहे. राज्यात सध्या ६,७४,७७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ३६,०१,७९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९२ एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५९,७२,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४३,४३,७२७ (१६.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७८,४२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे