कोरोनाचा उद्रेक कायम, राज्यात ५१ हजार ७५१ रुग्ण

कोरोनाचा उद्रेक कायम, राज्यात ५१ हजार ७५१ रुग्ण Maharashtra covid Update today;

Update: 2021-04-13 16:48 GMT



राज्यात कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण आजही कायम आहे. आज राज्यात ५१ हजार ७५१ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८% एवढा असून आज रोजी राज्यात एकूण ५,६४,७४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ५२,३१२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २८,३४,४७३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९४ एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२३,२२,३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,५८,९९६ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२,७५,२२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Tags:    

Similar News