आज राज्यात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.०२% एवढे झाले आहे.
आज राज्यात २१ हजार २७३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४०,८६,११० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,७२,१८० (१६.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २२,१८,२७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण ३,०१,०४१ ॲक्टिव्ह