महाराष्ट्रात कोरोमुळं तासाला 40 रुग्णांचा मृत्यू, तुमच्या जिल्ह्यात आहे स्थिती?
आज राज्यात ५९,०७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी आज राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४७,६७,०५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२% एवढा झाला आहे.
राज्यात आज ९६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०८,३९,४०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,४४,०६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,४७,६५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण ४,९४,०३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे