कोरोनाचा उद्रेक कायम, राज्यात 67 हजार 468 नवीन रुग्ण, काय आहे तुमच्या जिल्ह्याची स्थिती?
आज राज्यात ६७ हजार ४६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज ५४ हजार ९८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३२,६८,४४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१५ एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,९५,७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५६८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४६,१४,४८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,२७,८२७ (१६.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,१५,२९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.