राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक सुरुच, दिवसभरात ५६ हजार २८६ रूग्ण, ३७६ रूग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक सुरुच, दिवसभरात ५६ हजार २८६ रूग्ण, ३७६ रूग्णांचा मृत्यू, काय आहे राज्याची स्थिती

Update: 2021-04-08 17:17 GMT

राज्यात करोना विषाणूने थैमान घातले असून करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात ५६,२८६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ३६,१३० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर करोना बाधित ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१३,८५,५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,२९,५४७ (१५.१० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,०२,६१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,६६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


राज्यातली एकूण ५,२१,३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २६,४९,७५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.०५% एवढे झाले आहे.







 


 


 


Tags:    

Similar News