राज्यात कोरोनाने पार केला ५ लाखांचा आकडा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील रुग्णाची स्थिती?
राज्यात कोरोनाने पार केला ५ लाखांचा आकडा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील रुग्णाची स्थिती?;
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. आज राज्यात आज राज्यात ५८ हजार ९९३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर ४५ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५ लाख ३४,६०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आज राज्यात कोरानाने ३०१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे .सध्या महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर १.७४% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २६,९५,१४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९६% एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१६,३१,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,८८,५४० (१५.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९५,०६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,१५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.