कोरोना रुग्णांचा आकडा घटला, मृत्यूंचा आकडा चिंताजनक

Update: 2021-05-18 16:16 GMT

आज राज्यात ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर २८ हजार ४३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज बरे  होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची आणि कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी वाटत असली तरी महाराष्ट्रात आज मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 500 पेक्षा अधिक आहे.

आज राज्यात ६७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.६९% एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१५,८८,७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,३३,५०६ (१७.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ४,१९,७२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे 


Tags:    

Similar News