मुख्यमंत्रीसाहेब येताना गोरगरीबांना काही तरी घेऊन या?

मुख्यमंत्रीसाहेब येताना गोरगरीबांना काही तरी घेऊन या?;

Update: 2021-04-13 14:33 GMT
 

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. या संवादाद्वारे ते राज्यात लॉकडाऊन लावण्याची घोषणा करणार आहे. पहिल्या लॉकडाऊननेच लोकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब जनतेने या लॉकडाऊनध्ये काय करायचं असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता सोशल मीडियावरुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना या जनतेचा विचार करतील का?



मुख्यमंत्री जेव्हा लॉकडाऊनची घोषणा करतील तेव्हा अनेक घरातील चुली कशा पेटवाव्या? असा सवाल करोडो लोकांच्या नजरेसमोर उभा राहणार आहे. राज्य सरकार धान्य पुरवेल. असं बोललं जातंय. मात्र, हे धान्य शिजवायचं कसं? त्याच्यासाठी तेल मीठ आणायचं कसं? राज्यात तेलाचे भाव आणि इंधनाचे भाव आभाळाला भिडले आहेत. घर भाडं, गाडीचे हफ्ते, घराचा इएमआय कसा भरणार? याचंही सोल्यूशन येताना घेऊन या म्हणजे झालं. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब लॉकडाऊन लावताना या गोरगरीब जनतेचा विचार नक्की करा. अशी आशा लोक आता व्यक्त करत आहेत.


Tags:    

Similar News