कालिचरण दासला धर्मसंसदेच्या व्यासपीठावरच सणसणीत उत्तर

Update: 2021-12-27 14:18 GMT

Photo courtesy : social media

कालीचरण दास (kalicharan das)या एका साधूने धर्मसंसदेत (dharma sansad) राष्ट्रपिता महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर कालिचरण दासवर कडक कारवाईची मागणी होते आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करत नथुराम गोडसेचा देखील कालिचरण दासने जयजयकार केला आहे. छत्तीसगडमधील धर्मसंसदेत या कालिचरण दासने आपल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले, तसेच नथुराम गोडसेचे आभार मानत आपली हीन मानसिकता दाखवून दिली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी कालिचरण दासच्या या अत्यंत हीन वक्तव्यावर जोरदार टाळ्या वाजवल्या होत्या.


एकीकडे धर्मसंसदेत उपस्थित असलेल्याकालिचरण दासला धर्मसंसदेच्या व्यासपीठावरच सणसणीत उत्तर कुणीही किंवा आयोजकांनीही कालिचरण दासला रोखण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याच्या वक्तव्याचा निषेधही केला नाही. पण या धर्मसंसदेत उपस्थित असलेले महंत रामसुंदर दास यांनी आपली नाराजी जाहीर केली आणि धर्मसंसद सोडून ते निघून गेले. महंत रामसुंदर दास यांनी त्याच व्यासपीठावर उभे राहून कालिचरण दासने गांधींजींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांनाही फटकारले. " १९४७मध्ये देशाला ज्या परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले ते आठवा... महात्मा गांधींनी देशासाठी खूप काही केले म्हणून त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी दिली गेली, आणि त्यांच्याबद्दल या धर्मसंसदेच्या व्यासपीठावरुन अशी भाषा वापरली जाते हे अयोग्य आहे आणि तुम्ही त्या वक्तव्यावर टाळ्या वाजवता?" या शब्दात त्यांनी प्रेक्षकांना फटकारले. तसेच ज्या व्यासपीठावर महात्मा गांधी यांचा अपमान झाला तिथे आपण थांबणार नाही, असे सांगत ते निघून गेले.



Tags:    

Similar News