मुस्लिमांना खुलेआम हिंसाचाराची धमकी, महंतांना अटक होणार का?

गेल्या काही दिवसांपासून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच सितापुर येथे महंताने मुस्लिमांना खुलेआम हिंसाचाराची धमकी दिली आहे. त्यामुळे महंताला अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.;

Update: 2022-04-07 17:16 GMT

सध्या देशात द्वेषपुर्ण विधानं करून हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. त्यातच सितापुर येथे एका महंताने थेट मुस्लिमांना खुलेआम हिंसाचाराची धमकी दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारे हिंसाचाराची धमकी दिल्यामुळे देशातील धार्मिक वातावरण बिघडू शकते. त्यामुळे महंतांना अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सितापुर येथे एका महंताने जमलेल्या जमावाला उद्देशून म्हटले की, मुस्लिम लोकांनी हिंदू मुलीची छेड काढली तर त्यांच्या घरातील महिलांवर बलात्कार करण्यात येईल. तसेच आमच्या नादी लागलात तर मोठा हिंसाचार घडेल, अशा प्रकारे महंताने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. तर या महंतावर पोलिसांनी कारवाई करून महंताला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अल्ट न्यूजचे सहसंस्थापक असलेल्या मोहम्मद झुबेर यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ही हिंसाचारासाठीची धमकी आहे. तर महंत पोलिसांच्या उपस्थितीत मशिदीसमोर मुस्लिम महिलांना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. तर हा प्रकार खैराबाद, सितापुर येथील मशिदीसमोर 2 एप्रिल रोजी दुपारी 2 च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सितापुर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत क्षेत्राधिकारी नगर यांना तपास आणि आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सूचित करण्यात आल्याचे सांगितले आहे.

Tags:    

Similar News