LPG गॅस सिलींडरच्या दरात मोठी कपात

गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलींडरच्या दरात मोठी वाढ होत होती. मात्र आता LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे.;

Update: 2022-09-01 06:54 GMT

देशात सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त झाला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत होती. पण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आली नाही.

आजपासून मुंबईत 92.50 रुपये, दिल्लीत 91.50 रुपये, कोलकत्ता येथे 100 रुपये तर चेन्नईमध्ये 96 रुपयांनी गॅस सिलींडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलींडरच्या ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

आजपासून लागू झालेल्या नव्या दरानुसार 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची मुंबईत किंमत 1844 रूपये, दिल्लीत 1885 रुपये, चेन्नईत 2045 तर कोलकत्ता येथे 1995 रुपये इतकी आहे.

सातत्याने वाढ होणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलींडरच्या दरात 19 मे, 1 जून, १ जूलै, 6 जूलै आणि 1 ऑगस्ट 2022 रोजी कपात करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅसच्या दरात 100 रुपयांची कपात करण्यात आल्याने हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Tags:    

Similar News