लव्ह जिहाद देशासाठी घातक: किरीट सोमय्या
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा सामना अग्रलेखाचा दाखला देत ‘शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’, असं म्हणत जोरदार टीका केली आहे.;
भिवंडी पोलिस क्षेत्रातून २१ मुली पळवण्यात आल्या. हा लव्ह जिहादचा प्रकार तर नाही ना?
ठाकरे सरकार या प्रकरणाचा तपास करणार का ? "10 सप्टेंबरचा शिवसेनेचा सामना म्हणतो, लव्ह जिहाद देशासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना आमचा पाठींबा आहे. तर 21 नोव्हेंबरचा सामना म्हणतो लव्ह जिहादमध्ये गैर काय आहे? यावरुन शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग दिसून येतोय", अशी टीका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.