शिंदे गटाच्या खासदारांची लोकसभेत बसण्याची आसन व्यवस्था बदलणार?
शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर त्यांचे खासदार विरोधी बाकावर बसत होते. मात्र, आज शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेले १२ खासदार भाजप सोबत सत्ताधारी बाकावर बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना एनडीए मधून बाहेर पडल्यानंतर दिल्लीतील संसद भवनात शिवसेना खासदारांची आसन व्यवस्था विरोधी बाकावर करण्यात आली होती. आता यातील १२ खासदार पुन्हा एकदा भाजपसोबत गेले असल्याने या खासदारांची व्यवस्था सत्ताधारी बाकावर करण्यात येण्याची शक्यता आहे.
आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच शिंदे गटाचे खासदार सत्ताधारी बाकावर बसतील.
दरम्यान शिंदे गटाच्या खासदारांची रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर आज ते दिल्लीत या खासदारांसह पत्रकार परिषद घेणार आहेत.