अदानी प्रकरणावरून संसदेत गदारोळ, सभागृह दिवसभरासाठी तहकूब

Update: 2023-02-02 14:28 GMT

अदानी समूहावर हिंडेनबर्ग संस्थेने घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यावरून विरोधकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली. हिंडेनबर्ग संस्थेने अदानी गृपवर केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी गदारोळ केला. रिझर्व्ह बॅकेने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ला दिलेल्या कर्जाबाबत सर्व बँकांकडून माहिती मागवली आहे. याबाबत खासगी वृत्तसंस्थेने माहिती दिली. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली.

अदानी समूहाने बुधवारी रात्री उशिरा 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ रद्द केला होता. त्यापार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत गदारोळ केला. त्यानंतर आधी दुपारी 2 पर्यंत आणि त्यानंतर शुक्रवारी 11 वाजेपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News