#Lockdown2021 : वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शनिवार-रविवार असे दोन दिवस 'विकेंड लॉकडाऊन'ची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर पोलिसांनी ठीक-ठिकाणी नाकाबंदी करत काम नसतांना बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे, या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...