आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबूकद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी 15 एप्रिलपासून लावलेला लॉकडाऊन राज्यात कायम राहणार असल्याचं सांगितलं. कडक लॉकडाऊन नसेल मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी सुरु असलेले नियम कायम राहतील. असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे नियम शिथिल करणं योग्य ठरणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पाहा काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी?