नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास विरोध

राज्यात आता आणखी एका नामकरणाचा वाद पेटला आहे. यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास विरोध करत आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.;

Update: 2021-06-10 11:26 GMT

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता अधिक गंभीर झाला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुणाचे नाव द्यावे याबद्दलचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे. सिडकोनेही या मागणीला मान्यता दिली आहे.

पण भाजप आणि पनवेल उरण,नवी मुंबई या परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा पाटील यांचेच नाव विमानतळावा द्यावे अशी मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत दि. बा. पाटील यांचे नावं विमानतळाला देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलन सुरू केले आहे. भाजपनेही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

Tags:    

Similar News