रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरु झाल्यानं ट्रॅफीक जॅममधील कोंडी दूर
तब्बल अकरा महीन्यानंतर लोकल सेवा सर्वसामान्यंसाठी सुरु झाल्यानंतर ट्रफीक जॅम दूर होऊन रस्ते वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण लॉक डाउन मध्ये सर्वात ज्यास्त प्रभाव रस्त्यांवर पडला आणि त्यात ही वसई विरार - ठाणे आणि मुंबईला जोडणारा एकमेव वर्सोवा खाडी पुलावर तासंतास वाहतूक कोंडी होत होती. परंतू आज पासून लोकल रेल्वे ठराविक कालावधी साठी सर्व सामान्य जनतेसाठी उपलब्ध झाल्याने आता हळूहळू रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुद्धा कमी कमी होत आहे.
आजपासून काही ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येईल. काही ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता आहे. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फक्त ट्रेनच्या वेळापत्रकाकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी प्रवाश्यांकडून केली जात आहे.