कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात आता लोडशेडींग

Update: 2022-04-12 12:10 GMT

राज्याला आता भारनियमनाचा फटका बसणार आहे.देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेच्या पुरवठ्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्याने हे (loadsheding) लोडशेडिंग केले जात आहे. अशी माहिती उर्जामंत्री (Nitin Raut) नितीन राऊत यांनी दिली आहे.

वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला 2,500 ते 3,000 मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे- त्यामुळेच आम्ही लोडशेडिंग करत आहोत. आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, तसेच ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे," असे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले. 

महाराष्ट्रातील 2.8 कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने मंगळवारपासून राज्यातील काही भागात लोडशेडिंग जाहीर केले आहे. मात्र या उन्हाळ्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला याचा फटका बसणार नाही. असे देखील महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भांडुप-मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबई येथे महावितरणचे भारनियमन करणार नाही, कारण या भागात वीजबिल वसुली देखील उत्तम आहे असे महावितरणच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ज्या ठिकाणी वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा ठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू. यामध्ये G1,G2 आणि G3 श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे, जे बहुतांशी मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण भागात आहेत.

विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील काही भागांना लोडशेडिंगचा फटका बसणार विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. "काही शहरी भागात, आम्ही वीज खंडित करत असलो तरीही, आम्ही ते दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आखत आहोत," असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे

Tags:    

Similar News