LIVE | मनोज जरागेंची मोठी घोषणा 900 एकर जागेवर पुन्हा एकवटणार कोट्यावधी मराठे...!

कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी 900 एकर जागेवर पुन्हा एकदा कोट्यावधी मराठे एकवटणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.;

Update: 2024-03-10 07:16 GMT

कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी 900 एकर जागेवर पुन्हा एकदा कोट्यावधी मराठे एकवटणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान सभेसाठी मैदानाची पाहणी केली. 300 एकर जमीन कमी पडत असल्याने सभा स्थळाचा शोध सुरू आहे. तारीख आणि ठिकाण अद्याप ठरले नसले तरी लोकसभा निवडणुकीपूर्वीच ही विराट सभा घेण्याचे संकेत जरांगेंपाटील यांनी दिले आहेत. गृहमंत्री यांची सत्तेचा वापर करून गुंडशाही आणि दडपशाही सुरू असल्याने पुन्हा एकदा शांततेत कोट्यावधी मराठा एकवटणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.

पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील अश्वलिंग देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहच्या समारोपप्रसंगी शनिवारी मनोज जरांगे यांनी अश्वलिंग देवस्थानचे दर्शन घेतल्यानंतर जवळच तयार करण्यात आलेल्या सभास्थळी बोलताना जरांगे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या आत्याच्या भूमिकेत आहेत. ते पोलीसांचे कान फूंकुन मराठ्यांना अटक करण्याचे आदेश देत आहेत.

दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाल राजकारण आणि निवडणूकीत रस नाही. नोकर भरतीप्रक्रिया १० टक्के आपक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. येत्या काळात ९०० एकरवर सभा घेऊन मराठा काय आहे हे दाखवू, असा इशारा मनोज जरांगे यांनी भाषणातून राज्य सरकारला दिला. 


Full View

Tags:    

Similar News