अकोल्यातील चिमुकलीला एचआयव्हीची बाधा; चौकशीचे आदेश

Update: 2021-09-02 08:15 GMT

जालना : अकोल्यातील एका चिमुकलीला रक्तपेढीतील रक्तातून एचआयव्हीची बाधा झाली झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. रक्तदात्याकडून रक्त घेताना त्याच्या रक्ताची तपासणी केली नव्हती का? आणि हे रक्त खासगी रुग्णालयामार्फत त्या चिमुकलीला देताना रक्ताची तपासणी करण्यात आली की नाही? याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

दोन ते तीन दिवसांत या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.अशा घटना समोर आल्यानंतर एसबीटीसीकडून त्वरीत कारवाई केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संदर्भात बोलताना ज्यावेळी राज्यात 700 मॅट्रिक टन पेक्षा अधिक ऑक्सिजन लागेल त्यानंतरच राज्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जातील असं ते म्हणाले.

Tags:    

Similar News