साहित्य संमेलनाचा मिळालेला नकार - हेरंब कुलकर्णी

हेरंब कुलकर्णी यांना अंमळनेर येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण न मिळाल्याने त्यांनी नाराजी असून;त्यांनी त्यांची नाराजी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे नाराजी व्यक्त केली आहे.;

Update: 2024-02-02 04:52 GMT

साहित्य संमेलन निमंत्रणाची मी कधीच वाट बघितली नाही..लेखक असूनही फार उत्सुकता ही मला नसते. पण यावर्षी साने गुरुजींच्या १२५ जयंती निमित्त गुरुजींच्या कर्मभूमीत हे संमेलन होते आहे आणि मी 'शिक्षकांसाठी साने गुरुजी ' या विषयावर १२५ व्याख्याने देण्याचा संकल्प केलेला. त्यामुळे सहज वाटले की साहित्य संमेलन व्यासपीठावर आपण या व्याख्यानाची सुरुवात गुरुजींच्या कर्मभूमीत केली तर नक्कीच हा विषय राज्यभर पोहोचेल असे भाबडेपणाने वाटले. कारण गुरुजींचे शिक्षक असणारे रूप फार परिचित नाही व ते मी फार तपशीलात मांडतो.


साने गुरुजींवर माझे पुस्तक आहे त्यामुळे मला बोलवतील हा भ्रम मुळीच नव्हता कारण अभ्यासक असण्यामुळे निवड होण्याचा काळ मागे पडला...त्यामुळे ' अलक्षित साने गुरुजी ' या परिसंवादात मला शिक्षक साने गुरुजी या विषयावर बोलू द्यावे म्हणून मी उषा तांबे यांना डिसेंबर महिन्यात फोन केला.त्यांनी पत्रिका नक्की झाल्याचे सांगितले. पुण्याचे मिलिंद जोशी यांना बोललो. ती कल्पना त्यांना खूप आवडली. त्यांनी बोलतो असे सांगितले. तिथले संयोजक डॉ जोशी यांनी ही गुरुजींचे शिक्षक म्हणून रूप तुम्ही मांडावे यासाठी महामंडळा शी बोलतो असे सांगितले...मला असे बोलण्यात संकोच वाटला नाही कारण हेतू वेगळा होता..



 


आणि शेवटी इतके होऊन त्या परिसंवादात माझे नाव घेतले नाही..

मी यासाठी लिहितो आहे की एखाद्या कार्यकर्त्याला मनापासून वाटले की आपण एका प्रकल्पाची सुरुवात साहित्य संमेलन व्यासपीठावरून करावी तर ते शक्य नाही. वेगवेगळ्या साहित्य संस्था जे वक्ते सुचवतील तेच यांचे अभ्यासक...त्यापलीकडे हे शोध घेणार नाही...अतिशय नम्रपणे (अहंकार वाटला तरी) सांगतो की आज महाराष्ट्रात साने गुरुजींचे जे अभ्यासक आहेत त्यात मी नक्कीच आहे. त्यांच्यावरील माझे पुस्तकाच्या ५ आवृत्त्या आल्यात. तुम्हीही आमचा शोध घेणार नाही आणि गुरुजी पोहोचवावे म्हणून मान अपमान न मानता संकोच न करता विनंती केली तर तांत्रिक उत्तरे देणार...

Full View

माझ्यासारख्या गावोगाव व्यासपीठ उपलब्ध असणाऱ्या माणसाला अडचण नाही. मी गुरुजी वर १२५ व्याख्याने देणे कालपासून सुरूही केले आणि पुढची निमंत्रणे आली..

पण ही अखिल भारतीय व्यासपीठे किती कर्मठ झाली आहेत, त्यांना कार्यकर्ता किंवा वेगळी भावना समजत नाही.. याचे वाईट नक्कीच वाटले...

१२५ व्या माझ्या शेवटच्या व्याख्यानाचा समारोप मी, त्याच अंमळनेर ला गुरुजी जिथे शिक्षक होते तिथे जाऊन करील. ते व्यासपीठ यांच्यापेक्षा नक्कीच उंच आहे...

हेरंब कुलकर्णी

Tags:    

Similar News