ऐका दारुबंदीवर देवेंद्र फडणीस काय म्हणतात ते?
चंद्रपूर मधील दारूबंदी मंत्रिमंडळाच्या निर्णयाने उठवल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
यावर भाजपचा टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे विधिमंडळातील भाषणांचा दाखला देत भाजपवर पुन्हा पलटवार केला आहे.
सचिन सावंत म्हणाले,चंद्रपूरची दारुबंदी का उठवली यासाठी देवेंद्र फडणवीसजींच्या म्हणण्यानुसार मालपाणीचे पुरस्कर्ते असलेल्या सुधीर मुनगंटीवारजी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या प्रबोधनाकरिता देवेंद्र फडणवीसजींपेक्षा अधिक सुयोग्य कोण असेल बरं? भाजपाचा दुटप्पीपणा उघड करताना ऐका बरं फडणवीस जी काय म्हणतात ते!