१९६४ सालच्या सुवर्ण पदक जिंकणाऱ्या हॉकी संघाचे कर्णधार चरणजीत सिंग यांचे निधन

Update: 2022-01-27 12:08 GMT

१९६४ सालच्या टोकीयो ऑल्मिपिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणार्या हॉकी संघाचे कर्णधार चरणजीत सिंग यांचे हिमाचल येथे असलेल्या उनामध्ये राहत्या घरी निधन झाले.चरणजीत सिंग ९० वर्षाचे होते.चरणजीत सिंग यांना पाच वर्षापुर्वी अर्धांगवायुचा झटका आला होता.त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

१९६४च्या ऑल्मिपिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे नेतृत्वाबरोबरच चरणजीत चरणजीत हे १९६० च्य ऑल्मिपिक रौप्य पदक विजेत्या संघाचेही भाग होते.याचबरोबर १९६२ च्या एशियन गेम्समधील रौप्य पदक विजेत्या संघातही त्यांचा समावेश होता.

चरणजीत सिंग यांचे चिरंजीव व्ही.पी सिंग यांच्या माहिती प्रमाणे पाच वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांची हालचाल मंदावली होती. ते काठीच्या सहाय्याने चालत होते. आज सकाळी ते आपल्याला सोडून गेले. व्ही. पी. सिंह पुढे म्हणाले की, माझी बहीण उनामध्ये आल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Tags:    

Similar News