शिवसेनेची नाराजी, काँग्रेसकडून टोमणा आणि राष्ट्रवादी कडून चिमटे ; सांगलीत रंगला नेत्यांचा कलगीतूरा
सांगली : सांगलीतील एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मंत्री आणि नेत्यांमध्येच कलगीतुरा रंगला. या कार्यक्रमात नेत्यांची राजकीय टोलेबाजी बघायला मिळाली.
सुरुवातीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीत एकत्र काम करत असताना, आमचं आणि आमचे शहराध्यक्ष रुपेशच नाव कार्यक्रमाच्या निमंत्रणात कसं विसरले? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. बांधलेला इमला ढासळवण्याचे काम अवघड असते, पण ती कला जयंत पाटील यांच्याकडे आहे, म्हणूनच सांगली महापालिकेत भाजपकडून सत्ता काढून घेऊन महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. अशी टोलेबाजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केली.
त्यांनतर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी टोमणा मारला, राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी चांगले आहेत, आणि त्यांचे सल्लागार पण चांगले आहेत, मात्र, आमचे काँग्रेसचे उपमहापौर उमेश पाटील हे गरीब आहेत, असं विश्वजित कदम यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हसा पिकला.
सांगली मिरजेचा विकास व्हावा आणि शहर आमच्या मनासारखं चालावं म्हणून दिग्विजय सूर्यवंशी यांनी गडबडीत भाजपाकडून सत्ता काढून घेतली. मी आणि विश्वजित पण सत्तांतर नको, म्हणत होतो. मात्र विद्यमान महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी कोणाच ऐकलं नाही, अससं मिश्लीलपणे वक्तव्य करत पालकमंत्री जयंत पाटील यांनी भाजपाच्या नेत्याना डिवचले. शिवाय भाजपचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांना उद्देशून मिरजेतील गणेश तलाव सुशोभीकरण करा, असा सल्ला देत जयंत पाटीलांनी आवटी यांना राजकीय चिमटे काढले.