काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते पदासाठी आमदार विजय वडट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु अधिकृतरीत्या विधानसभा अध्यक्ष यांनी अद्याप तरी विरोधी पक्ष नेत्याची निवड केली नाही. यावर आज अधिवेशनात बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांना खोचक टोला लगावला.
दरम्यान वडेट्टीवार यांनी तलावातील स्टोरेज वाढवण्यासंदर्भात पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की "होऊ घातलेले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार असं म्हणताच अधिवेशनात हास्य पिकल. यावर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की अजून त्याची अधिकृत घोषणा केली नाही. त्यावर फडणवीस म्हणाले की म्हणून तर होऊ घातलेल्या असं म्हटलं आहे. यावर एकच अधिवेशनात हास्यमय वातावर झालेलं पाहायला मिळालं