भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला लाज वाटते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंची रेणू शर्मा प्रकरणावरून जीभ घसरली

भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला लाज वाटते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंची रेणू शर्मा प्रकरणावरून जीभ घसरली laxman dhoble taunt dhananjay munde in pandharpur rally on renu sharma issue;

Update: 2021-04-13 09:14 GMT




सध्या राज्यात कोरोनाने रुग्ण वाढत आहेत. राज्यात कधीही लॉकडाऊन लावलं जाऊ शकतं. अशात पंढरपूर येथे पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं कोरोनाने निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून समाधान अवताडे यांना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोनही पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचाराची पातळी आता घसरली आहे.

माजी मंत्री भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित धनंजय मुंडे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. धनंजय मुंडे यांच्यावर ढोबळे यांनी रेणू शर्माप्रकरणावरून टीका केली.

 "माय बहीण करवली म्हणून आली. धनंजय मुंडे म्हणाले, वहिनी तुम्ही आलात म्हणजे ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय सारखंच. दोघी बहिणी बहिणी एकत्र राहावा. मग एकदा वीज कनेक्शन घेतलं की मीटर पडणारच. मीटर पडलं. दोन पोरं झाली. त्या दोन पोरांना आपलं नाव दिलं. त्यांना विचारलं अरे तू नाव कसं देतोस? तेव्हा ते म्हणाले, मला अजिबात भीती वाटत नाही. महाराष्ट्रातील माझा लाडका नेता पुरोगामी आहे. असे नवीन विषय पुरोगामीत्वाचे स्वीकारले पाहिजे. असं सांगतानाच भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते. पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही"

अशा शब्दात ढोबळे यांनी मुंडेंवर टीका केली.

Tags:    

Similar News