श्रीरापुरात मिरवणूकी दरम्यान गोंधळ घालणार्‍या तरुणांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार

Update: 2021-10-20 04:21 GMT

अहमदनगर : पैगंबर जयंतीनिमित्त श्रीरापूर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समजावून सांगूनही काही तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला होता. अखेर नाईलाजाने पोलिसांनी या तरुणांना हुसकावून लावण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. छत्रपती शिवाजी महाराज रोडवरून सय्यद बाबा चौक याठिकाणी घोडा मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक झाल्यानंतर फक्त घोडा व तीनचार कार्यकर्ते परत येतील असे पोलिसांनी सांगण्यात होते. मात्र, 16 ते 18 वयोगटातील काही तरुण पुन्हा घोडा मिरवणूक काढण्याच्या पवित्र्यात होते.

दरम्यान मिरवणूक चौकात येताच समजावून सांगूनही या तरुणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.त्यामुळे पोलिसांनी या तरुणांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तरुण जास्तच गोंधळ घालत असल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. दरम्यान घटनेची माहिती कळताच काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी दोन्ही समाजातील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून कार्यक्रम शांततेत पार पाडावेत, कोणताही गोंधळ घालू नये, गोंधळ घालणार्‍यांविरुध्द पोलीस कारवाई करतील असा इशारा यावेळी दिला.

Tags:    

Similar News