Lata Mangeshkar यांच्या गायनाची सुरूवात आणि पाचोरा कनेक्शन
लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अचानक चर्चेत आला आहे. पण त्याचं नेमकं कारण काय?
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तर आपल्या गायनाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांचे पाचोरा कनेक्शन हा विषय चर्चेत आला.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला. त्यामुळे लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी उपाधी मिळाली. पण या गानसम्राज्ञीच्या करीयरचे आणि पाचोऱ्याचे एक अनोखे कनेक्शन समोर आले आहे.
गानकोकिळा लता मंगेशकर लहान असताना 1935 साली त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर यांच्यासोबत लता मंगेशकर सौभद्र नाटकाच्या निमीत्ताने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात गेल्या होत्या. त्यावेळी मंगेशकर कुटूंबाची परिस्थिती अगदीच बिकट होती. त्यामुळे ते गावागावात जाऊन प्रयोग करत असत. त्यावेळची आठवण लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितली आहे.
लता मंगेशकर या एका मुलाखतीत म्हणाल्या की, 1935 साली वडील दिनानाथ मंगेशकर यांच्यासोबत सौभद्र नाटकाच्या निमीत्ताने लता मंगेशकर पाचोरा शहरात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या नाटकातील नारद नावाचे पात्र अचानक आजारी पडले. त्यामुळे नारदाचे पात्र कोण करणार, असा प्रश्न दिनानाथ मंगेशकर यांना पडला होता. त्यावेळी लहान असलेल्या लता मंगेशकर यांनी मी नारदाचे पात्र करू का ? असा प्रश्न वडील दिनानाथ मंगेशकर यांना विचारला. त्यावेळी पर्याय नसल्याने दिनानाथ मंगेशकर यांनी लतादिदींना नारदाचे पात्र करण्याची परवानगी दिली. त्यावेळी लता मंगेशकर यांनी नारदाचे पात्र केले. तर त्यांनी गायलेल्या गाण्याला प्रेक्षकांमधून वन्स मोरही मिळाला आणि हीच माझ्या करियरची सुरूवात होती, असे लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. तर या व्हिडीओ काँग्रेसचे स्थानिक नेते सचिन सोमवंशी यांनी संग्रही ठेवला होता. मात्र लता मंगेशकर यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.