लग्नासाठी जमवलेले दागिने वाहून गेलेल्या पूजा चव्हाणच्या लग्नाचा भार, अभिनेत्री दिपाली सय्यद उचलणार

Update: 2021-08-08 17:13 GMT

२२ जुलै दरड कोसळून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक लोकांचा मृत्यू झाला. जल प्रकोपाने अनेकांचे संसार मोडून पडले,द रड व महापुरात जिव वाचलेले लोक आता पुढे जगावे की मरावे? या विवंचनेत आहेत.

पोलादपूर साखर सुतारवाडी येथील दरडीमध्ये चव्हाण कुटूंबीयांची आयुष्य भरांची पुंजी पाण्यात वाहून गेली. घरं वाहून गेलं. चव्हाण कुटुंबाच्या वाट्याला हे दुःख आलं. काबाडकष्ट करून पोटाला चिमटा काढून मोठ्या आशेने मुलीच्या लग्नासाठी दागदागिने केले होते. महापुराच्या संकटात आपल्या झोपडीत काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून चव्हाण कुटुंबाने गावातील सुताराच्या घरी दागिने ठेवण्यास दिले.

मात्र, ते घर दरडी खाली आले, अन सारे संपून गेले, बाप अपंग असल्याने आता पुन्हा हे दागिने कसे जमवणार, मुलीच्या लग्नाचं काय होणार? या विचारांनी अन् अश्रूंनी आईच्या मनात घर केलं होतं. या कुटुंबाची व्यथा मॅक्स महाराष्ट्र ने 'मुलीच्या लग्नासाठी जमवलेले दागदागिने गेले, आता मुलीच्या लग्नात काय करावं? चव्हाण कुटुंबियांची कैफियत...' या ठळक मथळ्याखाली मांडली होती. व जनतेला मदतीचे आवाहन केले होते..

या संकटात पुन्हा उभे राहण्यासाठी कुणी तरी यावं अन मदतीचा हात दयावा. या अपेक्षेने असलेल्या या कुटुंबाला अभिनेत्री दीपाली भोसले सयद यांनी प्रत्यक्ष भेटून मोठा आधार दिला आहे. त्यांनी या मुलीच्या लग्नात सर्व मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Full View

दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून पूजा चव्हानच्या लग्नातील दागदागिने व संपूर्ण खर्च उचलणार असल्याचं आश्वासन सय्यद यांनी दिलं आहे. या कुटुंबाला जीवनावश्यक साहित्य देखील या भेटीत त्यांनी दिलं.

दिपाली सय्यद यांच्या मदतीच्या हाताने चव्हाण कुटुंबाला आता जगण्याची उमेद मिळाली असून त्यांनी दीपाली सय्यद यांचे आभार मानले आहेत.

Tags:    

Similar News