अमरावती : अमरावती भूमि अभिलेख कार्यलयात पीआर कार्डसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर व अमरावती शहरामधील झोपडपट्टी मधील पी.आर. कार्ड धारक तसेच प्लॉट मालक यांना अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप होत आहे. सोबतच येथे येणाऱ्या नागरिकांसोबत अधिकारी गैरवर्तणुक करत असल्याचे म्हणत त्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अनेक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.
अमरावती भुमीअभिलेख कार्यालयामध्ये अनेक दिवसापासुन कार्यरत असलेले भुमिअभिलेखपाल गणेश कळमकर यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक शहर अध्यक्ष मनोज उर्फ गुड इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केली.
या सर्व गंभीर प्रकरणाची भुमिअभिलेख कार्यालयाकडून विभागीय व जिल्हास्तरीय खातेनिहाय चौकशी करावी,अभिलेखापाल गणेश कळमकार यांना निलंबित करण्यात यावे ही मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.