राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव सध्या शिक्षा भोगत आहेत. लालू यांना निमोनिया झाला असून कारागृह प्रशासनाने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे.
यादव यांना गेल्या दोन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यानंतर त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीमध्ये लालू यांना निमोनिया झाल्याचं निदान झालं त्यानंतर लालू यांना कारागृह प्रशासनाच्या सल्ल्यावरून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चारा घोटाळ्याची शिक्षा भोगत असलेले लालू यादव सध्या रांचीतील RIMS रुग्णालया मध्ये उपचार घेत होते.
त्यांची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांच्या आठ सदस्यांच्या टीमने दिलेल्या अहवालानुसार लालू यांना दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि पत्नी राबडी यादव लालूंच्या भेटीला लालू प्रसाद यादव यांना भेटण्यासाठी त्यांचे पुत्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि पत्नी राबडी यादव AIIMS मध्ये दाखल झाले आहेत.