केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही सुब्रमण्यम यांचा राजीनामा

Update: 2021-10-09 02:04 GMT

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. के व्ही सुब्रमण्यम यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे की, माझा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मी शिक्षण विश्वात परत येण्याचा निर्णय घेतला आहे, राष्ट्राची सेवा करणे हा एक विशेषाधिकार आहे आणि मला अद्भुत समर्थन आणि प्रोत्साहन मिळाले आहे.

केव्ही सुब्रमण्यम दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दररोज जेव्हा मी नॉर्थ ब्लॉकला जात होतो तेव्हा मी स्वतःला या विशेषाधिकाराची आठवण करून देत होतो. विशेषाधिकारासह येणाऱ्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केव्ही सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची जागी कोण असणार याबाबत केंद्र सरकारकडून अजूनतरी कुणाचे नाव जाहीर केलेले नाही.

केव्ही सुब्रमण्यम यांनी 7 डिसेंबर 2018 रोजी मुख्य आर्थिक सल्लागार पदाची सूत्रे स्वीकारली होती.

आयआयटी कानपूर आणि आयआयएम कोलकाताचे ते माजी विद्यार्थी आहे. सुब्रमण्यम डिसेंबर 2018 मध्ये सीईए म्हणून नियुक्तीपूर्वी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक होते. त्यांचे आधी या पदावर असणारे अरविंद सुब्रमण्यम यांनी "वैयक्तिक कारणे" देते आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद काही महिन्यांसाठी पद रिक्त होते. के व्ही सुब्रमण्यम यांनी 7 डिसेंबर 2018 रोजी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला होता.

Tags:    

Similar News