कुर्ला इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच

मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर येथे सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Update: 2022-06-28 06:43 GMT

मुंबईतील कुर्ला (Kurla Building collapse) भागातील नाईक नगर (NaikNagar) येथे सोमवारी रात्री चार मजली इमारत कोसळल्याने आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबरोबरच सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

कुर्ला पुर्व येथील एसटी बस डेपोच्या जवळ असलेल्या नाईक नगर सोसायटी येथील चार मजली इमारत सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कोसळली. यामध्ये 20 ते 25 जण दबल्याची चर्चा होती. तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्याची सुरूवात केली. तर या दुर्घटनेतील 16 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप बचावकार्य सुरू आहे.

कुर्ला इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना सायन रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर नऊ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

या दुर्घटना झालेल्या चार मजली इमारतीतील नागरिकांना महापालिकेने नोटीस दिली होती. मात्र तरीही लोक तिथेच वास्तव्यास होते. त्यामुळे या दुर्घटनेत 8 ते 10 कुटूंब बाधित झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

कुर्ला येथील नाईकनगर येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेतील कुटूंबांना एक लाख रुपये तर मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

Tags:    

Similar News