'कृष्णेची पाणीपातळी पुन्हा वाढणार'; आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती
हवामान विभागाने या आठवड्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने सांगीलतील कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा 40 ते 42 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
सांगली : राज्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. दरम्यान हवामान खात्याने या आठवड्यात कोयना धरण क्षेत्र व परिसरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
या आठवड्यात देखील कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा 40 ते 42 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातून स्थलांतरीत झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना मिळाल्याशिवाय पुन्हा घरी परतू नये. असं आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
दरम्यान पूराने बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनात माल, मौल्यवान वस्तू , अत्यावश्यक वस्तू पुन्हा नेण्याची घाई करू नये असंही महापालिका आयुक्त कापडणीस यांनी म्हटलं आहे.