देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. याच क्रांतिकारकांच्या बलिदानातून आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. या क्रांतिकारकांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचं काम सांगली जिल्ह्यातील बलवडी या गावात करण्यात आलंय. या ठिकाणी क्रांतिकारकांच्या नावाने वृक्ष लाऊन ते वृक्ष जोपासले आहेत. यातून क्रांतिस्मृती वन उभे राहिले आहे. याबद्दल जाणून घेऊयात या विशेष रिपोर्ट मधून
#maxmaharashtra #newsupdate #independenceday