कोरेगाव-भीमा आयोगालाच्या सुनावणीला १५ नोव्हेंबर पासून सुरवात : IPS रश्मी शुक्लांना समन्स

Update: 2021-11-09 10:33 GMT

पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे रखडलेले कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाचे काम आता शासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यामुळ पुन्हा सुरु होणार असून IPS रश्मी शुक्लांच्या साक्षीनं येत्या १५ नोव्हेंबरपासून कामकाजाला सुरवात होणार आहे.

दोन सदस्यीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. जे.एन. पटेल असून १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार आणि दंगलीची चौकशी करत आहे. आयोगाला सुरवातील चार महीन्याचा कालावधी चौकशीसाठी देण्यात आला होता. त्यानंतर सातत्यानं मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयोगाच्या चौकशी बहुतांश कामकाज पुण्यात पार पडले असून यामधे प्रामुख्यानं पुणे ग्रामीण परीसरातील साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आहे. यापुढील काळातही आयोगाचं काम पुणे आणि मुंबईतून सुरु राहणार आहे. मुंबईतील माहीती आयोगाच्या कार्यालयात आयोगाला तात्पुरती जागा देण्यात आली होती. सदर जागा अपुरी असल्यानं आयोगानं मुंबईतील सर्व सुनावण्या पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला होता.




 




 



 



याबाबत आयोगानं कठोर शब्दात शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. ८ ते १२ नोव्हेंबर असं सुनावण्याचं वेळापत्रक होतं. पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला, लखमी गौतम, निवृत्त पोलिस अधिकारी बिपीन बिहारी तसेच एल्गार परीषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार यांच्या चौकशीची नियोजन आयोगानं येत्या १५ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचं जाहीर केलं आहे. मलबार हिलवरील सह्याद्री गेस्ट हाऊसमधे सदर चौकशी आणि सुनावणी पार पडेलं असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

Tags:    

Similar News