कारण नसताना कोकणवासीय कधीही मदत मागत नाहीत, पण आता तो मोठ्या अडचणीत आहे त्याला भरघोस मदत द्यायला हवी– माजी मंत्री प्रभू

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आणि याचा कोकणाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे कोकणवासियांकडून मदतीची मागणी होत आहे. यावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटले आहे की , कारण नसताना कोकणवासीय कधीही मदत मागत नाहीत, पण आता तो मोठ्या अडचणीत आहे त्याला भरघोस मदत द्यायला हवी;

Update: 2021-07-25 13:15 GMT

कोकणी माणसाने कारण नसताना पैसे द्या अशा मागण्या कधीच केल्या नाही,पण आता कोकणवासींयाचं कंबरडं मोडलेलं आहे. त्यांची क्षमताच नाही. सातत्याने येणाऱ्या संकटाने कोकणवासीय संकटात आहे. अशा वेळेला सरकारने भरीव मदत दिल्याशिवाय पर्याय नाही आणि ही मदत फक्त कागदावर नको राहायला असं स्पष्ट मत माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं. कोकणातील पूर परिस्थितीवर ते मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. चक्रिवादळ, तौक्ते वादळ, आणि आता पूरपरिस्थितीमुळे आंबा शेतकरी, मच्छीमार बांधव, सर्व सामान्य नागरिक मोठ्या अडचणीत आला आहे. सरकारबरोबर सर्वांनी त्याला मदतीचा हात दिला पाहिजे असं आवाहन देखील प्रभू यांनी केलं आहे.

कोकणावर ही वेळ का आली?

कोकणावर ही वेळ का आली? याचं कारण सागंताना त्यांनी कोकणातील विकासाकडे सरकारने लक्ष दिलं नाही. 2003 साली आपण पत्र व्यवहारही केला होता. पण त्यात राजकारण झालं आणि कोकणाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता तरी सरकारने विशेष योजना राबवली पाहिजे असं ते म्हणाले. सह्याद्रीच्या डोंगरातील मोठी जंगलतोड झाली. तेथील डोंगर पोरके झाले आणि पावसामुळे हे पाणी कोकणात आलं. पाणी साचून राहण्यासाठी जागा नाही त्याचा हा परिणाम असल्याचं प्रभू म्हणाले. सह्याद्रीच्या रांगामधून जे पाणी येतं ते माती घेऊन येतं आणि हा गाळ नदीत वर्षानुवर्ष साचत आला आहे. यासाठीही कोणतेही नियोजन केले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

जे नुकसान झालं ते मोठं आहेराज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आणि याचा कोकणाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे कोकणवासियांकडून मदतीची मागणी होत आहे. यावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटले आहे की , कारण नसताना कोकणवासीय कधीही मदत मागत नाहीत, पण आता तो मोठ्या अडचणीत आहे त्याला भरघोस मदत द्यायला हवीराज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आणि याचा कोकणाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे कोकणवासियांकडून मदतीची मागणी होत आहे. यावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटले आहे की , कारण नसताना कोकणवासीय कधीही मदत मागत नाहीत, पण आता तो मोठ्या अडचणीत आहे त्याला भरघोस मदत द्यायला हवी. कोकणवासीयांचं कंबरडं मोडलं आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलेले पाहिजेत. नुकसान भरपाई म्हणजे जे नुकसान झालं आहे. त्याची भरपाई ना मग नुकसानीचा जो पंचनामा होईल त्याप्रमाणात भरपाई सरकारने द्यावी असं प्रभू यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

नैसर्गिक आपत्तीवर कायम स्वरूपी योजना हाच एकमेव पर्याय

नैसर्गिक आपत्तीवर कायम स्वरूपी योजना हाच एकमेव पर्याय कोकणासाठी असेल असं मत प्रभू यांनी व्यक्त केलं आहे.2003 साली असा प्रयत्नं झाला पण तो पूर्णत्वास गेला नाही. कोकणात पाऊस पडतो पण नुकसान होते ते चिपळून आणि खेड भागाचे. याचाही विचार करायला हवा. याला वाढते शहरीकरण कारणीभूत आहे का? याचाही विचार करून कोकणचा विकास केला पाहीजे असं प्रभू यांनी म्हटले आहे. शहरीकरणाच्या नियोजनावर विचार केला पाहिजे असं सांगताना प्रभू म्हणाले की, गाळ असल्यामुळे नदीचे पात्र अरूंद झालेत. त्याकडेही गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. माणसाने श्वास घेतला नाहीतर माणसाचा मृत्यू होतो मग नदीचंही तसंच आहे. नदीलाही श्वास घ्यायला जागा पाहिजे. विकास करताना हा मुद्दाही विचारात घेतला पाहिजे. कोणताहा प्रकल्प करताना कोकणचं कोकणपण टिकवणारा विकास असायला हवा असा आग्रह देखील त्यांनी धरला. अन्यथा पुन्हा हेच प्रकार होत राहणार अशी भीती प्रभू यांनी व्यक्त केली.

Tags:    

Similar News