कोकणात होणाऱ्या 21 जुलै च्या मुसळधार पावसकने अक्षरशः थैमान घातले होते .महाड , चिपळूणसह अनेक शहरे पाण्याखाली होती. दरड, मातीच्या साम्राज्याने पूर्ण कोकणातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. परंतु सद्या ही वाहतुकीचे काही मार्ग चालू करण्यात आले आहेत. चिपळूण बहादूरशेख येथील वशिष्टि नदीवरील पुलाचा काही भाग पाण्यात वाहून गेला होता. त्यामूळे त्याची तात्पूर्ती डागडूजी करण्यात आलेली आहे.
त्यावरुन सद्यस्थितीत लहान वाहनांना सोडण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अवजड वाहने सध्या तरी बंद ठेवण्यात आलेली आहेत. तर रत्नागिरी- चिपळूण- मुंबई ला येणार रस्ता हा (NH66) आणि गुहागर-चिपळूण ते कराड (NH266) हा मार्ग सुरू करण्यात आला आहे. तर रत्नागिरी आंबाघाट मार्गे कोल्हापुर हा मार्ग अजूनही बंद असून रत्नागिरी-चिपळूण बहादूशेख नाका अवजड वाहनांसाठी पूर्णता बंदी आहे. अशी माहिती रत्नागिरी पोलीस यांनी त्यांच्या फेसबुक पेज वरून दिली.