दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व केएल राहुलकडे
कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागी आता केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.;
मुंबई // कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागी आता केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
दरम्यान , मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे, तर रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली. यापूर्वी रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार बनला होता.
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत , इशान किशन , युजवेंद्र चहल , रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रणंद कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी मिळालेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना १९ जानेवारी, दुसरा २१ आणि तिसरा २३ जानेवारीला खेळवला जाणार आहे.