एका 'चहावाल्या'वर ठाकरे सरकारची 'कंत्राटकृपा', किरीट सोमय्यांचा आरोप
ठाकरे सरकारने एका चहावाल्याला शंभर कोटींचे जंबो कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पार्टनर डॉ. सुजीत पाटकर यांच्या जंबो कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे पार्टनर डॉ. सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या काळ्या यादीतील कंपनीला बोगस कंत्राट मिळाल्याचा आणि रुग्णांच्या जीवाशी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या पुणे शहरात दाखल झाले होते. मात्र किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
किरीट सोमय्यांनी ट्वीटरवरून काही कागदपत्र पुरावे असल्याचा दावा करत शेअर केले. तर त्यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसचे मालक सुजीत पाटकर यांच्यावर आरोप केले आहेत. तर चहाचा दुकानदार असलेला राजीव साळूंखे या कंपनीतील सर्वात मोठा पार्टनर असल्याचे समोर आले आहे. याबाबत किरीट सोमय्यांनी ट्वीटरवरून माहिती अधिकारातील कागदपत्रे पुरावे असल्याचा दावा करत शेअर केले आहेत.
चहाचे दुकान असलेले राजीव साळूंखे हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसचे मोठे पार्टनर असून त्यांना ठाकरे सरकारकडून शंभर कोटींचे जंबो कोविड सेंटरमध्ये कंत्राट मिळाल्याचे कादगपत्रे पुरावे असल्याच्या दाव्याने किरीट सोमय्यांनी दिले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्यांनी पुरावे सादर केल्याने ठाकरे सरकारसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
किरीट सोमय्यांवर पुणे शहरात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत. तर त्यांनी थेट जंबो कोविड सेंटरच्या कंत्राटाचे पुरावे ट्वीट केले आहेत. त्यामुळे सरकार यावर काय प्रतिक्रीया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.