शेतकरी आंदोलनाला खलिस्तानवाद्यांशी जोडणाऱ्या झी न्यूजला NBDA झटका, व्हिडीओ तात्काळ डीलिट करण्याचे आदेश

Update: 2021-11-23 13:55 GMT

न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल स्टॅडर्ड अथॉरिटी(एनबीडीएसए) ने झी न्यूज ला दोन व्हिडीओ डीलिट करण्यास सांगितलं आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात हे व्हिडीओ असून हे व्हिडीओ 19 आणि 20 जानेवारी ला प्रकाशित करण्यात आले होते.

काय आहे NBDSA?

न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल स्टॅडर्ड अथॉरिटी ही एक देशातील टॉप रेटेड न्यूज चॅनलचा समावेश असलेली संघटना आहे. पुर्वी या संघटनेचं नाव न्यूज ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन (NBA) असं होतं. मात्र, या संघटनेचं नाव न्यूज ब्रॉडकास्टर्स एंड डिजिटल एसोसिएशन (NBDSA) असं करण्यात आलं आहे.

का बदलले नाव?

तंत्रज्ञानामुळे माध्यमांमध्ये मोठा बदल झाला आहे. बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध झाली आहेत. डिजिटल मीडिया हे उद्याचं भविष्य आहे. ही बाब समजून घेऊन डिजिटल मीडियातील न्यूज ब्रॉडकास्ट सदस्यांचा संघटनेत समाविष्ट करण्यासाठी NBA ने नाव बदलून NBDA करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

इंद्रजीत घोरपडे यांनी झी न्यूज वर शेतकरी आंदोलनासंदर्भात 19 आणि 20 जानेवारी ला प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडीओ बाबत आक्षेप व्यक्त केला होता. या आक्षेपावर निवृत्त न्यायाधीश एके सिकरी यांनी हे दोनही व्हिडीओ डीलिट करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे व्हिडीओ?

या व्हिडीओमध्ये सोशल मीडियावरील ट्रॅक्टरचे व्हिडीओ एकत्र करुन चॅनलने बदल करुन दाखवले होते. या व्हिडीओचं वर्णन करताना टीव्ही Anchor हे सोशल मीडियावरील ट्रॅक्टर्सचे व्हिडीओ शेतकऱ्याचे असल्याचं सांगत आहे. याच ट्रॅक्टरचा उपयोग 26 जानेवारीच्या रॅलीसाठी करण्यात आल्याचा दावा देखील Anchor ने केला होता.

तक्रार करताना इंद्रजीत घोरपडे यांनी हेडलाइन आणि टिकरवर प्रसारीत केल्या गेलेल्या शब्दावर आक्षेप घेतला आहेत. हिंदीमध्ये हे शब्द आहेत. "गणतंत्र के खिलाफ राष्ट्र", "गणतंत्र दिवस पर गृहयुद्ध", "ट्रैक्टर मार्च या युद्ध", "आंदोलन पर खालिस्तान का कब्जा" अशा शब्दांचा वापर शेतकऱ्यांच्या बाबत करण्यात आल्याचं दिसून येतं.

या व्हिडीओचं वर्णन करताना Anchor पुढे म्हणतात... विचार करा. ही लढाई भारताच्या विरोधात आहे. काय होत आहे? हे शेतकरी देशाच्या विरोधात लढण्याचं षडयंत्र करत आहेत का? जर दहशतवादी शेतकऱ्यांच्या स्टेजचा वापर करत असतील तर त्यासाठी शेतकरी जबाबदार नाही का?

NBDSA चा निर्णय…

NBDSA ने आपल्या निर्णयात, टीव्ही चॅनल्सनी धार्मिक वृत्तांकन करताना काळजी घ्यावी. लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज हटवल्याचा चुकीचा व्हिडिओ चॅनलने दाखवला. अँकर आणि चॅनलचे हेडलाइन थेट आचारसंहिता आणि प्रसारण मानकांचे उल्लंघन करते.

अशा शब्दात एनबीडीएसए ने झी न्यूजला झापले आहे. तसंच चॅनेलने हा व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून, इतर सर्व प्लॅटफॉर्मवरुन (YouTube) वरून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच NBDSA ला सात दिवसांच्या आत लेखी उत्तर कळवण्यात यावं असे आदेश दिले आहेत.

Tags:    

Similar News