जे केरळ सरकारला जमलं ते ठाकरे सरकारला का नाही?

Update: 2021-05-05 17:48 GMT

देशातील वाढती कोरोना महामारी गंभीर रुप घेत आहे. देशातील सर्वच राज्य कोरोना महामारीमुळे हतबल झाले आहेत. रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार हतबल झालेल्या जनतेला कुठलाही दिलासा देताना पाहायला मिळत नाही.

कामगार घरी बसून आहेत. मात्र, घरभाडे, वीज बील हे येतच आहे. त्यामुळं खाण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या जनतेसमोर आता वीज बील, घर भाड्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत केरळ चे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी 2 महिने वीज बील, पाणी पट्टी आणि बॅकांची वसूली थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

केरळ पेक्षा महाराष्ट्रात रुग्ण संख्या अधिक असून महाराष्ट्रात गेल्या 20 दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळं जे केरळच्या मुख्यमंत्र्यांना जमलं ते ठाकरे सरकारला का जमलं नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

केरळमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थीत लोकांसमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळं केरळ सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Tags:    

Similar News