केरळमध्ये २० हजार कोटींचं कोरोना पॅकेज, १८ वर्षावरील व्यक्तीसाठी प्रत्येकी १००० रुपयांची तरतूद
केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत मांडला. त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटातून अर्थव्यवस्था वाचण्यासाठी २० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त १८ वर्षावरील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणासाठी १ हजार रुपये देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी
मोफत लसीकरणासाठी आवश्यक साधनं आणि सुविधा यांच्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच सरकारने जाहीर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. हे पॅकेज मुख्यतः आरोग्य आणि अन्न या बाबीसाठी असणार आहे. कोरोनाला आळा घालणे व राज्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवणे हे सरकारचे मुख्य धोरण असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
आम्ही जागतिक महामारीच्या तिसऱ्या लाटेविषयी चर्चा करू, मात्र, सध्याची परिस्थिती ही राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आव्हानात्मक आहे. आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात किनारी भागांना देखील विशेष पॅकेज देण्यात आलं आहे. किनाऱ्या लगतच्या भागात पाऊस आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवरच ही तरतूद करण्यात आली आहे.
अर्थमंत्री बालगोपाल यांनी २०२१ - २२ वर्षांच्या अर्थसंकल्पासाठी माजी अर्थमंत्री टी एम थॉमस इसाक यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये काही आवश्यक बदल करून हा 'सुधारित अर्थसंकल्प' जाहीर केला आहे.