कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे केली जात आहेत. या कामांतर्गत अनेक ठिकाणी डीपी रस्तेही तयार केले जात आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्याचे समोर आले आहे. यामुळे स्मार्ट सिटीचे रस्ते बनवतांना या बांधकामांमध्ये मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. अशा इमारतींवरही आता पालिकेने कारवाई सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील दावडी गावातील डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या सहा मजली इमारतीवर कारवाई करत पालिकेने ती इमारत पाडली आहे.
महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत डीपी रस्त्यावर ३०० हून अधिक अनधिकृत इमारती आहेत. या अनधिकृत बांधकामांवर केवळ तोडण्याची कारवाई न करता ही बांधकामे पूर्णतः काढली जाणाक आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.