लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या 'कार्तिक' च्या उपचाराची मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबदारी

प्रजासत्ताक दिनी लोकशाहीवर केलेल्या भाषणामुळे प्रसिध्द झालेल्या कार्तिक वजीर या चिमुकल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.;

Update: 2023-02-03 03:15 GMT

प्रजासत्ताक दिनी (Republic Day) आपल्या भाषणातून लोकशाहीची (Democracy) अनोखी व्याख्या सांगितल्याने कार्तिक वजीर (Kartik Vajeer) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कार्तिकने सांगितलेल्या लोकशाहीच्या अनोख्या व्याख्येमुळे त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतूक करण्यात येत होते. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जालना (jalna) जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथे शिक्षण घेणाऱ्या कार्तिकची वाटूर येथे भेट घेतली. यावेळी कार्तिकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर लोकशाहीची व्याख्या सांगणारे भाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकचे कौतूक केले. तसेच कार्तिकच्या डोळ्यांवर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

कार्तिकचे व्हायरल झालेले भाषण

खरंतर आज लोकशाही दिन आहे. आजपासून लोकशाही सुरू झाली. मला लोकशाही खूप आवडते. कारण लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही करु शकता. प्रेमाने राहू शकता, भांडू शकता, पण मला मोक्कार धिंगाणा करायला, माकडासारखे झाडावर उड्या मारायला, फिरायला खूप आवडते. माझे बाबा मला कधीही मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात. मात्र, माझ्या गावातील लहान मुलं माझं नावं सरांना सांगतात आणि दहशतवादी जशी लोकशाही पायदळी तुडवतात तसे सर मला पायदळी तुडवतात. माझ्यासारखा गरीब मुलगा आख्या तालुक्यात आढळणार नाही, असं कार्तिकने आपल्या भाषणात म्हटले आहे.

राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले होते कौतूक

राजेश टोपे यांनी कार्तिकला आपल्या घरी बोलवून त्याचे भाषण ऐकून घेत त्याचा सत्कार केला होता.

Tags:    

Similar News