सोशल मीडीयावर प्रसिध्द असणारे आणि अन्यायाविरोधात सातत्यानं उभे राहणारे नितेश कराळे मास्तर हे पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याची माहिती त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिलीय.
दरम्यान यावेळी कराळे मास्तर म्हणाले की, "लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला. मी तुमच्यासाठी लढेन हा कराळे मास्तरचा वादा आहे. देवळी पुलगाव किंवा वर्धा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय.
काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तर वेगळा पवित्रा घ्यावा लागेल. काँग्रेसकडून उभं राहण्याची तयारी चालू असल्याचं कराळे मास्तर यांनी सांगितलंय. मात्र, पक्षात गेल्यानंतर देखील असाच निर्भीड कराळे मास्तर म्हणूनच बोलेन असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय.