उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

Kalyan Singh Uttar Pradesh Bharatiya Janata Party UP Ex Chief minister passes Away;

Update: 2021-08-21 18:10 GMT
उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते कल्याण सिंह यांचं शनिवार रात्री निधन झालं आहे. लखनऊ च्या एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 89 वर्षांचे कल्याण सिंह यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते.


कोण होते कल्याण सिंह ?

कल्याण सिंह यांनी राज्यस्थान चे राज्यपाल पदही भूषवलं होतं. त्याच बरोबर भाजपला उत्तरप्रदेशमध्ये मोठ्याप्रमाणात सक्रीय करण्यात त्यांचा मोठा हातभार राहिला. राम मंदिर आंदोलनात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. 1952 मध्ये कल्याण सिंह यांचं लग्न रामवती देवी यांच्या सोबत झालं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा (राजवीर सिंह) आहे. राजवीर सिंह सध्या भाजपचे खासदार आहेत. तर कल्याण सिंह यांचा नातू संदीप सिंह यूपी च्या योगी सरकारमध्ये मंत्री आहेत.

कल्याण सिंह यांचा जन्म 5 जानेवारी, 1932 ला उत्तर प्रदेशच्या अतरौली मध्ये झाला. त्यांनी बीए आणि एलएलबी चं शिक्षण घेतलं होतं. कल्याण सिंह दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. केंद्रात मोदी सरकार आल्यानं त्यांना राज्यस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पद मिळालं.

राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे कल्याण सिंह यांच्या काळात 6 डिसेंबर 1992 ला अयोध्या येथे बाबरी मशीद पाडण्यात आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने उत्तर प्रदेशमधील कल्याण सिंह सरकारला बर्खास्त केलं. त्यानंतर सप्टेंबर 1997 पासून नोव्हेंबर 1999 पर्यंत कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

Kalyan Singh Uttar Pradesh Bharatiya Janata Party UP Ex Chief minister passes Away



Tags:    

Similar News