ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मोठा अपमान, कार्यकर्त्यांनी दिली बेशर्माची फुल

Update: 2021-06-13 05:49 GMT

भाजपचे राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना निषेधाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीकडे जात असताना भारतीय राष्ट्रीय छात्र संघाच्या (एनएसयूआयच्या NSUI) कार्यकर्त्यांनी गोला या मंदिराच्या चौकात सिंधिया यांना घेरलं. अचानक समोर आलेल्या कार्यकर्त्यांना पाहून त्यांना गाडी थांबवावीच लागली. NSUI कार्यकर्त्यांनी घोषणा देत बेशर्माचे फूल आणि निषेध पत्र दिले. निषेध पत्रात कार्यकर्त्यांनी लिहिलं आहे,

"लोक कोरोनाने मरत होते तेव्हा तुम्ही कुठे होते" पत्र वाचताच सिंधियाचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांनी लगेचच गाडीच्या काचा वर करून तिथून निघून गेले. भाजप नेते तसेच राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया हे तीन दिवसांसाठी राज्याच्या दौर्‍यावर होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात एखाद्या नेत्याची ही पहिलीच भेट होती.

सिंधिया इतक्या दिवसापासून गायब असल्याने लोकांमध्ये संताप होता. ही बाब लक्षात घेता त्यांच्या तीन दिवसाच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक ठेवण्यात आली होती. कोणत्याही संशयितांना त्यांच्या जवळ जाऊ दिले जात नव्हते.

एवढंच काय तर पोलीसांनी काही लोकांना 2 दिवसांसाठी नजरकैद सुद्धा केलं होतं. त्यामध्ये बरेचसे NSUI चे कार्यकर्तेच होते. पोलिस NSUI चे नेते वंश माहेश्वरी यांना नजरकैदेत ठेवले होते. मात्र, एनएसयूआयचे प्रमुख नेते सचिन द्विवेदी पोलिसांच्या हाती लागले नाही.

ज्योतिरादित्य यांना ३ दिवसीय ग्वालियर दौऱ्यामध्ये लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची जाणीव होती. मात्र, दौरा सहिसलामत पार पडला असताना शेवटी शहर सोडण्यापूर्वी त्यांना लोकांच्या विरोधाचा सामना करावाच लागला.

शनिवारी, १२ जूनला सकाळी सिंधिया आपल्या गाडीने दिल्लीकडे निघाले असताना, एनएसयूआयचे कामगार नेते सचिन कुमार यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी गोला या मंदिराच्या चौकात सिंधिया यांची कार अडवली. आणि त्यांचा निषेध केला. सिंधियांना वाटलं कोणी समर्थक असतील त्यामुळे त्यांनी गाडीच्या काचा खाली घेतल्या, त्यांनी कारची काच खाली घेताच सिंधियाविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. दरम्यान लगेचच एनएसयूआय नेते सचिन यांनी सिंधियाना बेशर्माची फुलं आणि निषेध पत्र दिले.

एनएसयूआय नेते सचिन यांनी सिंधिया यांना बेशर्माची फुल का दिली असं विचारलं असता त्यांनी 'ही फुल कोणत्याही स्थितीत कुठेही वाढतात. म्हणूनच याला बेशरमाची फुल असं म्हणतात. त्याचबरोबर एक निषेध पत्र देण्यात आलं, ज्यात लिहिलं होत की, कोरोना संसर्गामुळे लोक मरण पावत असताना तुम्ही कुठे होतात. कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी होताच तुम्ही ग्वाल्हेर-चंबळ आणि भोपाळमध्ये दिसू लागलात. घरोघरी जाऊन लोकांच्या मरणाची चेष्टा करताय, तुम्ही राजकारणातील संधी शोधत आहात. असं सचिन यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News